555.jpg 
विदर्भ

तापमान @ 43 सेल्सीअस ः एकदा पीपीई कीट घातली की सहा तास नाही मिळत पाणीसुद्धा

भगवान वानखेडे

अकोला ः तापमानाचा पारा दिवसागणिक चढत आहे. अशातच शुक्रवारी (ता.24) अकोल्याच्या तापमानाची 43.4 सेल्सीअस इतकी नोंद झाली. असे असतानाही मात्र, अंगाची लाहीलाही करणाऱ्या तापमानात सर्वोपचारमधील डॉक्टर कोरोनासारख्या महाभयंकर आजाराशी दोन हात करीत आहेत. ऐवढेच नव्हे तर आयसोलेशन कक्षातील डॉक्टरांनी एकदा पीपीई कीट घातली की, त्यांना तब्बल सहा तास काही खाणे तर सोडा साधे पाणीसुद्धा प्यायला मिळत नाही. तेव्हा अकोलेकरांनो या कोरोना फायटर्सच्या समर्पणाची कदर करून आता तरी बाहेर पडू नका असे म्हणण्याची वेळ आली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत अकोल्याचे तापमान राज्यात सर्वश्रृत आहे. अकोल्याचा पारा एप्रिलमध्ये 40 गाठून मेमध्ये 45 सेल्सीअस गाठतो.  यंदाही तीच परिस्थिती आहे. शुक्रवारी अकोल्याच्या तापमानाची 43 सेल्सीअस ऐवढी नोंद झाली. या तापमानापासून बचावासाठी अकोलेकर ए.सी., पंखे, कुलर आधी उपकरणांचा आधार घेतात. मात्र, दुसरीकडे याच अंगाला चटका लावणाऱ्या उन्हात सर्वोपचारच्या आयसोलेशन कक्षात आळी-पाळीने कार्यरत असलेले डॉक्टर कुठल्याही उपकरणाचा आधार न घेता कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी जुटले आहेत. तर यात भरीस भर म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी अंगावर घातलेली पीपीई कीट एकदा अंगावर घातल्यानंतर या कोरोना फायटर्स सहा-सहा तास साधे पाणीसुद्धा पिता येत नाही. तेव्हा अकोलेकरांनी समुह संक्रमनाचा धोका टाळण्यासाठी या घरातच राहून डॉक्टरांना सहकार्य करण्याची वेळ आली आहे.

एक शिफ्टमध्ये सहा ते सात डॉक्टर कार्यरत
दिवसा सहा-आठ तास तर रात्री 12 तासांच्या शिफ्टमध्ये हे डॉक्टर काम करत आहेत. या आणीबाणीच्या काळात अहोरात्र वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. यात पीपीई किट परिधान करुन काम करणे आव्हानात्मक आहे. हा किट घालताना आणि काढताना सुरक्षेचे नियम पाळणे बंधनकारक आहे. मात्र पीपीई घातल्यानंतर सहा-सात तास पाणी सुद्धा पिता येत नसल्याचे डॉक्टर सांगतात.

अक्षरशः घामाने न्हाऊन जावे लागते
सध्याची उष्णता वाढत असून वॉर्डांमधील एसी देखील बंद आहे. त्यामुळे, डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत झाकलेल्या या वॉटरप्रूफ पीपीई किटमध्ये घामाने भिजायला होते. चेहऱ्याला एन-95 मास्क, त्यावर थ्री प्ले सर्जिकल मास्क आणि त्यावर घातलेल्या चेहरा झाकण्याच्या प्लास्टिकच्या कव्हर मुळे नीट श्वासही घेता येत नाही, गुदमरल्यासारखे होते. त्यामुळे, थकवा डोकेदुखी आणि इतर समस्या उद्भवत आहेत. श्वास सोडण्याच्या प्रक्रियेत गॉगलवर धुके जमा होते म्हणून समोर पाहणेही अंधुक होते. याही परिस्थितीत सतत अलर्ट राहून येणाऱ्या प्रत्येक पेशंटला संभाव्य धोका समजून त्यावर दिलेल्या नियमावलीप्रमाणे उपचार करण्याचा निर्णय त्वरीत घ्यावा लागतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT